About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti,Gadhinglaj

पंचायत समिती, गडहिंग्लज

ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना शिवण यंत्रे देणे

पंचायत समिती गडहिंग्लज येथील समाज कल्याण विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पध्दत

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव २०% राखीव निधीमधून पिको फॉल / शिवण यंत्रे देणे.
लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी लाभार्थीस शिवणकाम येत असले बाबत टेलरींग प्रशिक्षण संस्था / टेलर यांचे प्रमाणपत्र सत्य प्रत जातीचा दाखला व रुपये ५००००/- चा तलाठी / तहसिलदार / प्रांत यांचा असावा. ( या पैकी एक )
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी लाभार्थी मागास वर्गीय असावा

लाभार्थीस शिवणकाम येत असले बाबत टेलरींग प्रशिक्षण संस्था / टेलर यांचे प्रमाणपत्र सत्य प्रत. लाभार्थीने या पुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती लाभार्थीचा अर्ज जिल्हा परीषद सदस्यांचे शिफारशीने गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांचे कडे मंजूरीस सादर केला जातो.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) पिको फॉल यंत्र दिले जाते.
अनुदान वाटपाची पध्दत पंचायत समिती मार्फत.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? लाभार्थीचा अर्ज जिल्हा परीषद सदस्यांचे शिफारशीने गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांचे कडे.
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहीजे, हे ही स्पष्ट करावे. पंचायत समिती गडहिंग्लज येथील समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे.
१२ सोबत जोडावयाची परीशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले / दस्तऐवज ) जिल्हा परीषद सदस्य यांची शिफारस.
१३ त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना काही नाही.
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम गट विकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) —-
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी यादी समाज कल्याण विभाग प.स. येथे उपलब्ध आहे.
१७ उद्दीष्ट ( ठरविले असल्यास ) जिल्हास्तरावर निश्चीत केले जाते.
१८ शेरा ( असल्यास )

sewing

ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन पुरविणे

पंचायत समिती गडहिंग्लज येथील समाज कल्याण विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव २०% राखीव निधी योजने मधून ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन पुरविणे.
लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी लाभार्थी मागास वर्गीय असावा, लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रुपये ५००००/- च्या आत असावे, लाभार्थीस व्यवसाय करणेसाठी विज कनेक्षन व स्वत:ची जागा असावी, या पुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती जि.प. स्तरावरील अनुदान मागणी साठी लाभार्थीचा अर्ज ग्रामपंचायत व जिल्हा परीषद सदस्य यांचे शिफारशीने गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांना सदर.पं.स. स्तरावरील अनुदान मागणीसाठी पं.स. सदस्य यांचे शिफारसीने गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज सादर
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला रुपये ५००००/- चा तलाठी / तहसिलदार / प्रांत / यांचा असावा. ( या पैकी एक ), / सदर लाभार्थीस वरील योजनेचा लाभ देणेस हरकत नसले बाबत ग्राम सभेचा ठराव नंबर व दिनांक., यापुर्वी लाभ घेतला नसले बाबत ग्रामसेवक यांचा दाखला., , लाभार्थीस व्यवसाय करणेसाठी विज कनेक्षन व स्व:तची जागा असलेला असेस मेंटचा उतारा
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) ———
अनुदान वाटपाची पद्धत पंचायत समिती मार्फत.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? लाभार्थीचा अर्ज गट विकास अधिकारी यांचे मार्फत समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद कोल्हापुर यांचे कडे , तसेच पं.स. स्तरावरील मागणीसाठी प.स. कडे अर्ज सादर
अर्जाबरोबर भरावयाची ( असल्यास ) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे, पंचायत समिती गडहिंग्लज येथील समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे.
१२ सोबत जोडावयाची परीशिष्टे

( शिफारस पत्रे / दाखले / दस्तऐवज )

अ.नं.५ नुसार
१३ त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना काही नाही.
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम गड विकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे )
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी पंचायत समिती गडहिंग्लज येथील समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे.
१७ उद्दीष्ट ( ठरविले असल्यास ) जिल्हास्तरावर निश्चीत केले जाते.
१८ शेरा (असल्यास )

 

xerox

xerox

राजीव गांधी अपघात योजना

पंचायत समिती गडहिंग्लज शिक्षण विभाग येथील शासकीय प्रोत्साहनपर योजनांच्या कार्यवाहीची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राजीव गांधी अपघात योजना
लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी अपघात, वाहनाचे नुकसान, शैक्षणिक, साहित्य नुकसान
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी अपघात पंचनामा, वैद्यकीय उपचाराची बिले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती अपघात झाल्यानंतर दिवसाच्या आत क्लेम फॉर्म आणणे.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर ती ही तपशिल द्यावा ) ·        विना शस्त्रक्रिया – २०००/- * अपंगत्व – २००००/- ते ५००००/- पर्यंत * शस्त्रक्रिया –रु.१००००/- पर्यंत * अपघाती मृत्यु – ३००००/-
अनुदान वाटपाची पद्धत बिल सादर केल्यानंतर चेकने रक्कम मिळते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? शाळेमार्फत अर्ज तयार करून ग.शि.अ. यांचे शिफारशीने विमा कंपनीकडे सादर करणे
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. नमुना अर्जावरच अर्जदाराने माहीती भरली पाहिजे.
१२ सोबत जोडावयाचीपरीशिष्टे ( शिफारस पत्र / दाखल / दस्तऐवज ) नमुना अर्ज वैद्यकीय बिले.
१३ त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना क्लेम फॉर्म
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम मा. शिक्षणाधिकारीसा (प्राथ) जि.प.कोल्हापूर
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) उपलब्ध रक्कम अपघात धारकाला मिळते.
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी कार्यालयात उपलब्ध असते.
१७ उद्दीष्ट ( ठरविले असल्यास )

गडहिंग्लज पंचायत समितीवर ‘राष्ट्रवादी’ची हॅट्ट्रिक

गडहिंग्लज – येथील पंचायत समितीच्या 10 पैकी 7 जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची हॅट्ट्रिक साधली. तालुक्‍यातील पाच गटांवरही पक्षाने कब्जा मिळविला. विरोधी कॉंग्रेस, जनता दल, जनसुराज्य व शेकाप आघाडीला पंचायत समितीत केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीमधून बंडखोरी करून भडगाव गणातून अपक्ष लढणारे अमर चव्हाण 1519 मताधिक्‍याने विजयी झाले.

तालुक्‍यात चुरशीने निवडणूक झाली. राष्ट्रवादीचा विजयाचा वारू रोखण्यासाठी “गोकुळ’चे माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी, ऍड. श्रीपतराव शिंदे, प्रकाश चव्हाण, नानासाहेब पताडे यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या कॉंग्रेस, जनता दल, जनसुराज्य व शेकाप आघाडीला जनतेने सपशेल नाकारले. दोन दशकांत केलेला विकास व भविष्यातील विकास आराखडा सोबत घेऊन राष्ट्रवादीचे नेते बाबा कुपेकर यांनी तालुक्‍यात स्वबळावर निवडणूक लढविली. श्री. हत्तरकींच्या हलकर्णी आणि श्री. शिंदेंच्या नूल बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने ‘जोर का झटका’ दिला.

हलकर्णी गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना चार हजार मतांचा शेतकऱ्यांनी दिलेला कौल दखल घेण्याजोगा आहे. नूल गटातील राष्ट्रवादीचे शिवप्रसाद तेली पाच हजार मताधिक्‍याने विजयी झाले. पंचायत समितीचे उमेदवार तानाजी कांबळे, इक्‍बाल काझी यांनीही एक ते दोन हजार मताधिक्‍याने विजय संपादन केला. या गटाच्या निकालाद्वारेच राष्ट्रवादीने तालुक्‍यात विजयी सलामी दिली. भडगाव गटातील राष्ट्रवादीचे अप्पी पाटील तालुक्‍यात सर्वाधिक 13147 मते घेऊन विजयी झाले. मीनाताई जाधव यांच्या विजयाने नेसरी गट कायम राखण्यात कुपेकरांना यश मिळाले असले, तरी नेसरी गणात राष्ट्रवादीचे मुन्ना नाईकवाडी यांना 106 मतांनी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. कडगाव गटात कॉंग्रेसच्या क्रांतिदेवी कुराडे यांना राष्ट्रवादीच्या शैलजा पाटील यांच्याकडून 2892 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे वसंत नाईक, धनश्री गुरव, भाजपच्या निर्मला पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बसवराज मुत्नाळे, सुनीता चौगुले यांनीही नशीब आजमावले; परंतु मतदारांनी त्यांना नाकारले. जनसुराज्य शक्तीतून बंडखोरी करून भडगाव गणात अपक्ष म्हणून रिंगणात असलेले साखर कारखान्याचे संचालक रमेश आरबोळे यांचाही पराभव झाला.

सकाळी साडेनऊला गांधीनगरातील पालिकेच्या पॅव्हेलियनमध्ये मतमोजणी सुरू झाली. दहा वाजता नूल गटाचा निकाल जाहीर झाला. ध्वनिक्षेपकाद्वारे निकाल जाहीर होत होता. निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली, सहायक अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेने तीन तासांत निकाल जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली. पोलिस निरीक्षक आर. टी. जगताप यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त होता.

अपक्षाचा झेंडा…
तालुक्‍याच्या निवडणुकीत अमर चव्हाण यांच्या रूपातून पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार विजयी झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने श्री. चव्हाण यांनी बंड केले होते. याच गणात सर्वाधिक उमेदवार रिंगणात होते. निकालाबाबत श्री. चव्हाण म्हणाले, “”तालुक्‍यात भडगाव गणातील मतदारांचा कौल ऐतिहासिक आहे. हा माझा विजय नसून, कार्यकर्त्यांचा आहे. माझ्या रूपातून मतदारांनी कार्यकर्त्यालाच न्याय दिला आहे.”