About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti,Gadhinglaj

पंचायत समिती, गडहिंग्लज

गणवेश व लेखन साहित्य वितरण.

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकण घेणाऱ्या  अनुसूचित जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील मुले व मुलींना प्रती वर्षी १ गणवेश, लेखन साहित्य दिले जाते. गणवेशांची शासनाने ठरविलेली रक्कम ग्राम शिक्षण समितीला दिली जाते व त्यामधून ग्राम शिक्षण समिती लाभार्थ्यास गणवेशाचा लाभ देते.

 

  • योजनेचे निकष –

मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी व १०३ विकास गटातील ( गगनबावडा व शाहुवाडी ) सर्व विद्यार्थी पात्र ठरतात.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून  गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

विद्यार्थ्यांना–उपस्थिती भत्ता.

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती अनु. जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रत्येक हजर दिवसासाठी रु.१ प्रमाणे वार्षिक रु. २२० /- चे मर्यादेत मदत केली जाते.
  • योजनेचे निकष –

प्रत्येक महिन्याला ७५% पेक्षा जास्त दिवस हजरी असणे आवश्यक

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून  गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

शिष्यवृत्ती परिक्षा माध्यमिक व पूर्व माध्यमिक परीक्षा फी .

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत 100 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेचा लाभ मिळावा व स्पर्धात्मक परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी परीक्षा फी मध्ये सवलत

 

  • योजनेचे निकष –

मागासवर्गीय मुलांची १०० टक्के फी व सर्वसाधारण घटकांतील मुलांची ५० टक्के फी भरणेत येते.

 

  • अंमलबजावणी – सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

राजर्षि शाहू सर्वागींण शिक्षण व गुणवत्ता विकास कार्यक्रम .

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुल शाळेत आणणे, सर्वागीण / दर्जेदार शिक्षण देणे, शिक्षकांची गुणवत्ता व उपक्रमशीलता वाढवणे, शिक्षकांना अधिक सक्षम करणे, शिक्षणाची लोक चळवळ निर्माण करणे, प्रशासन सुलभीकरण करणे, 100 टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती, विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करणे, माता पालक संघ व शिक्षक पालक संघाची स्थापना करणे. एकूण शाळेची गुणवत्ता वाढवणे.

 

  • योजनेचे निकष –

विद्याथी सर्वागीण विकास उपक्रम, उपस्थिती बौध्दिक विकास, सराव चाचणी पध्दत, मूल्यशिक्षण, शारिरीक विकास, भावनिक विकास, राष्ट्रीयत्वाची जोपासना इ. संबंधी उपक्रम राबविणे, सामाजिक व पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करणे, शिस्त व सहकार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, वैयक्तिक गुणवत्ता वाढ, सामाजिक सेवा कार्यक्रम व अन्य कार्यक्रम राबविण्यात येतात. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच पालक उद्बोधन, महिला सबलीकरण, शैक्षणिक उठावासाठी व वंचित घटकासाठी उपक्रम राबविण्यात येतात.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची आमंलबजावणी  तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केले जाते.

जि. प. शाळेतील विद्यार्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजन करणे .

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याची तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर सांस्कृतिक स्पर्धा घेणेत येते या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षिस व प्रमाणपत्र दिले जाते.

 

  • योजनेचे निकष –

वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटांमध्ये तालुकास्तरावर स्पर्धा घेवून विजयी खेळाडूंना व संघाना जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी पाठविले जाते.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची आमंलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केले जाते.

पशूसंवर्धन योजना

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना

  • राज्य पुरस्कृत योजना:-
  • विशेष घटक योजना ७५ % अनुदानावर( दुधाळ गाई/म्हैस/शेळी गट वाटप योजना)
  • दोन दुधाळ गाय/म्हैस गट:-

जनावरांची अंदाजित किंमत(विम्यासह) रु.८५०६१/- आहे.७५% अनुदान रु.६३७९६/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु.२१३३२/- किंवा बँक कर्ज घेऊन भरणा करणे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

  • अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला(प्रांत/तहसिलदार यांचे कडील)
  • ७/१२ उतारा,८ अ उतारा व घरठाण उतारा.
  • दारिद्र्यरेषे खालील असलेबाबत दाखला.
  • सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)
  • महिला बचत गट.
  • रेशनकार्ड व ओळखपत्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)
  • अपत्याचा दाखला.
  • रहिवाशी व शौचालय असलेचा दाखला
  • बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

 

लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.

  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक लाभार्थी
  • अल्प भूधारक लाभार्थी
  • सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी
  • महिला बचत गटातील लाभार्थी

) विशेष घटक योजना १० शेळ्या व १ बोकड  –

अनुदान व आर्थिक निकष :- शेळी गट ( १० + १ ) योजना अंदाजीत किंमत ( विम्यासह ) रु. ७१२७९/- आहे. ७५% शासकिय अनुदान रु. ५३४२९/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु. १७८१/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

  • अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत/तहसिलदार
  • ७/१२ उतारा,८ अ घरठाण उतारा ( असेसमेंट )
  • दारिद्र्य रेषेखालील दाखला.
  • सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)
  • महिला बचत गट.
  • रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)
  • अपत्य दाखला.
  • रहिवाशी व शौचालय असलेचा दाखला
  • बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

 

लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.

  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक लाभार्थी
  • अल्प भूधारक लाभार्थी
  • सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी
  • महिला बचत गटातील लाभार्थी

 

  • एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम – जिल्ह्यातील सधन कुक्कुट विकास प्रकल्पात अपारंपरिक पशुपक्षी पालन करणे व स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना देणे तसेच अंडी व मांस उत्पादनात लक्षणीय वाढ करणे. स्वयंरोजगार निर्मिती करणे.
  • कामधेनु दत्तक ग्राम योजना – जनावरांचे आरोग्य संवर्धन व दुध वाढविण्यासाठीची योजना. दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील १ गांव निवडून १२ टप्यात वर्षभर दुधउत्पादन व वैरण उत्पादन इत्यादीसाठी योजना राबविणे.
  • नाविन्यपूर्ण योजना ( शेळी (१०+१) / कुक्कुट पक्षीगृह बांधकाम योजना ) –
  • ठाणबंध शेळी पालन योजने अंतर्गत ( १० + १ ) शेळी गट पुरविणेत येतो व स्वंयरोजगार निर्मिती करणे ५० टक्के अनुदानावर सदर योजना राबविली जाते. सदर योजना सर्वसाधारण ५० टक्के व अनुसूचित जाती ७५ टक्के आहे. प्रकल्प किंमत रु ८७,५००/- अशी असून सर्वसाधारण लाभार्थी हिस्सा ४३,४२९ /- अनुसूचित जाती लाभार्थी हिस्सा २१,९६४/- आहे. स्वहिस्सा लाभार्थीने स्वत: करायचा आहे अथवा बँकेद्वारे उभा करावयाचा आहे.

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

१)    अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत / तहसिलदार

२)    ७/१२ उतारा,८ अ  घरठाण उतारा ( असेसमेंट )

३)    दारिद्र्य रेषेखालील दाखला.

४)    सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)

५)    महिला बचत गट.

६)    रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)

७)    अपत्य दाखला.

८)    रहिवाशी व  शौचालय असलेचा दाखला

९)    बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

 

लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.

१)    दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

२)    अत्यल्प भूधारक लाभार्थी

३)    अल्प भूधारक लाभार्थी

४)    सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी

५)    महिला बचत गटातील लाभार्थी

ब) १००० मांसल पक्षीगृह बांधकामासाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.

१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय करणे या योजनेंतर्गत एका युनिटव्दारे १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून पक्षीगृह बांधकामाचा व इतर साहित्यांचा अपेक्षित खर्च रु. २,२५,०००/- गृहीत धरण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के , अनुदान म्हणजेच रु. १,१२,५००/- तर अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी ७५ टक्के अनुदान म्हणजेच रु. १,६८,७५०/- या प्रमाणात अनुदान अनुज्ञेत आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

१)    अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत/तहसिलदार

२)    ७/१२ उतारा,८ अ  घरठाण उतारा ( असेसमेंट )

३)    दारिद्र्य रेषेखालील दाखला.

४)    सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)

५)    महिला बचत गट.

६)    रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)

७)    अपत्य दाखला.

८)    रहिवाशी व  शौचालय असलेचा दाखला

९)    बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र

 

लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.

१)    दारिद्रय रेषेखालील लाभार्थी

२)    अत्यल्प भूधारक लाभार्थी

३)    अल्प भूधारक लाभार्थी

४)    सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी

५)    महिला बचत गटातील लाभार्थी

 

  • विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम ( वैरण विकास कार्यक्रम ) – वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उत्साहित करणे. स्वत:ची तीन ते चार जनावरे असतील अशा सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये यशवंत व जयवंत सुधारीत बहुवर्षीय ठोंबे वाटप १०० टक्के अनुदानावर करण्यात येतात.

 

  • केंद्र पुरस्कृत योजना
  • हस्तचलित कडबाकुट्टीयंत्राच्या वापरांसाठी प्रोत्साहन – उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर करणेतसेच वाया जाणाऱ्या वैरणीचे प्रमाण कमी करणे. केंद्र हिस्सा ७५ टक्के व लाभार्थी हिस्सा २५ टक्के रु. ३,७५०/- इतके अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
  • अझोला लागवड व उत्पादन केंद्राचे प्रात्यक्षिक – हिरव्या वैरणीकरीता पर्यायी म्हणून अझोला लागवडीसाठी शेतकऱ्यांना अत्यावश्यक साधनसामुग्रीसह प्रशिक्षण देणे.
  • गवती कुरणांचा विकास – हलक्या / पडीक जमिनी विकसीत करून, कृषी हवामान प्रभागानुसार योग्य एकदल / व्दिदल प्रजातीची लागवड करणे. जमिनीची धुप थांबवणे व वैरणीचे उत्पादन करणे उत्पादित वैरण पशुधन,   पोषणांसाठी वापरून पशुधनाच्या आहारातील वैरणीची तुट कमी करणे.
  • वैरणीच्या विटा तयार करणाऱ्या केंद्राकरिता अर्थसहाय्य
  • क्षेत्रनिहाय क्षारमिश्रण व पशुखाद्यनिर्मिती केंद्राची स्थापना
  • मूरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य – अतिरिक्त हिरव्या चाऱ्याची आधुनिक पद्धतीने साठवण करून टंचाई काळात पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याची गरज भागविणे. १०० टक्के केंद्र हिस्सा मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्याकरिता रु. १.०५ लक्षाचे अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. यामध्ये रु. ७५,०००/- मुरघास खड्याचे बांधकाम करण्यासाठी व रु. ३०,०००/- विजेवर चालणाऱ्या कडबाकुट्टी यंत्र खरेदीकरीता अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.

 

राष्ट्रीय पशुधन अभियान

१ राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ( ४० + २ ) शेळ्यांचे गट वाटप करणे – राज्यातील ग्रामीण भागात स्वंयरोजगार निर्मिती करण्यासाठी ( ४० + २ ) शेळ्यांचे ५० टक्के अनुदानावर गट वाटप करणे ही योजना राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे.

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

महात्मा गांधी नरेगा २००८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु

योजनेची वैशिष्ट्ये

१८ वर्षावरील पौढ व्यक्तींना वर्षभर अकुशल रोजगाराची हमी

मजुरांची नोंदणी व जॉब कार्ड

  • रोजगार मिळविण्याकरिता जॉब कार्ड आवश्यक
  • जॉब कार्डसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे आवश्यक
  • १५ दिवसांत विनामुल्य जॉब कार्ड मिळणार
  • प्रत्येक कुटुंबाला एक जॉब कार्ड
  • जॉब कार्डची एक प्रत ग्रामपंचायतीमध्ये व एक प्रत कुटुंबाकडे

 

 कामाची मागणी व अर्ज

  • रोजगार आवश्यक असणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीने वेळोवेळी नमुना क्रमांक ४ मध्ये अर्ज करणे आवश्यक
  • नमुना क्रमांक ४ मध्ये अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतीने पोच पावती देणे आवश्यक
  • नमुना क्रमांक ४ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिळतील
  • रोजगाराची मागणी नोंदणीकृत व्यक्ती किंवा समूह नमुना ४ मध्ये करू शकतो
  • मागणी केल्यानंतर मजुराला १५ दिवसांत ग्रामपंचायतीने रोजगार पुरविणे आवश्यक अन्यथा बेरोजगार भत्ता मिळेल
  • मजुराने किमान ०७ दिवस सलग काम करणे आवश्यक
  • कामाच्या मागणीबाबत ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना तत्काळ कळवावे
  • गावापासून ५ कि.मी. परिसरात रोजगार उपलब्ध केला जाईल अन्यथा जास्त अंतराकरिता प्रवास खर्चाची तरतूद

 

मजुरीचे दर

स्त्री व पुरुष मजुरांना केंद्रशासनाव्दारे दरवर्षी निर्धारित केलेल्या समान दराने मजुरी

केलेल्या कामाच्या प्रमाणात ( मोजमापानुसार ) मजुरीची निश्चिती

 

सोयी व सुविधा

रोजगाराच्या जागी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, लहान मुलांची देखभाल याकरीता मुलभूत सुविधा उपलब्ध

बँकव्दारे अथवा पोस्टामार्फत मजुरीचे प्रदान

 

कामाची निवड

ग्रामसभा अथवा ग्रामपंचायतीने कामांची शिफारस करावी तसेच हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा

योजनेंतर्गत सामुहिक तथा वैयक्तिक लाभाची कामे, कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणे हे योजनेचे वैशिष्ट्य

सार्वजनिक अथवा वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामातील कुशल कामे ग्रामपंचायतींमार्फत करावी

जुनी कामे पूर्ण करूनच नवीन कामे हाती घेणे आवश्यक

एकूण कामांपैकी किमान 50% कामे ग्रामपंचायतींमार्फत, उर्वरित कामे इतर यंत्रणांमार्फत

मजुरांची कामाची मागणी व मागणीनुसार कामे पुरविणे यांची सांगड घालण्यासाठी दरवर्षी लेबर बजेट तयार करणे आवश्यक

अकुशल – कुशल प्रमाण ग्रामपंचायत स्तरावर व यंत्रणेच्या कामांसाठी तालुका स्तरावर 60:40 राखणे

कंत्राटदार नेमण्यास व यंत्र वापरण्यावर बंदी

ग्राम रोजगार सेवक

योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामसेवक यांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती

कागदपत्रे सांभाळणे व दैनंदिन उपस्थितीची नोंद घेणे ही ग्राम रोजगार सेवकांची जबाबदारी

ग्राम रोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतीमार्फत बँक खात्यावर जमा होणार

पारदर्शकता

झालेल्या सर्व कामांचा तपशील व खर्च यांची माहिती ग्रामसभेला देण्यात येणार

कामाच्या ठिकाणी कामाचे फलक लावणे आवश्यक

मजुरांची हजेरीपट सर्वांना माहितीसाठी उपलब्ध असणार

झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण

नवीन उपक्रम

पंधरवड्यात ग्राम रोजगार दिनाचे आयोजन

माहिती व तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन सुरु (1800223839)

53030 क्रमांक वर सशुल्क SMS

तक्रार निवारण प्राधिकारी ( ombudsman) चे सक्षमीकरण

राज्य गुणवत्ता व्यवस्थापन निरिक्षक (State Quality Monitor) ची नियुक्ती

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

राज्यभरात ई – मस्टर लागू

आधारमार्फत नरेगाची मजुरी अदा

इलेक्ट्रॉनिक निधी व्यवस्थापन प्रणालीची (EFMS) सुरुवात

मजुरांना मजुरी प्रदानाची वेतन चिठ्ठी (Payslip) मिळणार

योजनेंतर्गत अनुज्ञेय कामे

जलसंधारण व जलसंवर्धन कामे

माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध (ग्रेडेबंडिंग), कंपार्टमेंट बांध, गॅबियन बंधारा, वनराई बंधारा, सलग समतल चर, ट्रेंच कम माउंट व तत्सम कामे

जलसिंचनाची कामे

तलाव व कालव्यातील गाळ काढणे / सफाई, अस्तरीकरणव नूतनीकरण, मातीचे कालवे, नदी – नाल्यांचे पुनरुज्जीवन

दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवडीसह)

पडिक (गायरान) जमिनीवर वृक्ष लागवड व वैरण विकास योजना, रोपवाटिका, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन

 

रस्ते

गावातील बारमाही रस्ते, जोडरस्ते, स्मशानभूमी / पाणीपुरवठा विहिरीकडे जाणारे सिमेंट काँक्रीट / पेवर ब्लॅाक्स वापरून केलेले रस्ते

वैयक्तिक लाभाची कामे  

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील, भूसुधार योजनेतील इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी व वन अधिकार अधिनियमानुसार प्राप्त वन निवासी यांकरिता सिंचन विहिरी, शेततळी, फळबाग, भूसुधारणा इ. वैयक्तिक लाभाची कामे

सर्व जिल्ह्यात गावपातळीवर

खेळीची मैदाने तयार करणे

राजीव गांधी सेवा केंद्र

राज्य रोहयो अंतर्गत ‘क’ वर्ग नगरपालिकांचा समावेश

योजनेंतर्गतनवीन कामे

कृषी विषयक कामे

नॅडेप कंपोस्टिंग, गांडूळ खत तयार करणे (Vermi Composting). जैविक खते (Liquid Bio – manures),

पशुधन विषयक कामे

कुकुड पालनासाठी शेड, शेळ्या – बकऱ्यांसाठी शेड, कोबा करणे (Construction of pucca floor), युरीन टँक, चारा साठवण्याची व्यवस्था, अझोला – पूरक पशुखाद्य देण्याची व्यवस्था

मत्स्यव्यवसाय विषयक कामे

सार्वजनिक जमिनीवर हंगामी साचणाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय

समुद्रकिनारी भागातील कामे

समुद्र किनाऱ्यावर मासे सुकविण्यासाठी क्षेत्र (Fish Drying Yards) उपलब्ध करून देणे, बेल्ट व्हेजिटेशन

ग्रामीण क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासंबंधीची कामे

पिण्याच्या पाण्यासाठी साठवण खड्डे (Soak pits),

ग्रामीण स्वच्छतेची कामे

वैयक्तिक शौचालये, शाळेकरिता शौचालये, अंगणवाडी शौचालये, शोष खड्डे, उघडी गटारे, घनकचरा व्यवस्थापन

योजनेची माहिती :  www.nrega.nic.in www.mahaegs.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध

 

 

 

 

 

Supply Sweing Machine Panchayat Samiti Gadhinglaj

Tender Details  :

Tenders are invited for Supply sweing machine panchayat samiti gadhinglaj from India with reference number 5514822. This tender is closing on 7th Mar 2016

SUMMARY Supply sweing machine panchayat samiti gadhinglaj
TOT REF. NO. 5514822
NOTICE TYPE Tenders
DOCUMENT REF. NO. 01/2015-16
COMPETITION NCB
FINANCIER Self Financed

PURCHASER
RDD-CEO-KOLHAPUR
Pancahayat samiti gadhinglaj 416502

Attn BDO Gadhinglaj
Country :India
Email :-
URL :-


TENDER DETAILS
Tenders are invited for supply sweing machine panchayat samiti gadhinglaj

tender value:inr 7,00,000

DEADLINE 7th Mar 2016
DOCUMENTS Download

About Gadhinglaj

आमचं गडहिंग्लज :
कोल्हापूर जिल्हाच्या दक्षिण भागातील तालुका म्हणजे गडहिंग्लज. महाराष्ट्र कर्नाटकाच्या हद्दीवर वसलेल्या आमच्या गडहिंग्लजात गूळ, भुईमूग व मिरचीची मोठी बाजारपेठ प्रसिद्ध आहे. जवळचं हरळी येथे साखर कारखाना व तेलगिरणी आहे.
गडहिंग्लजचे नाते व्यापाराच्या माध्यमातुन कोकणाशीही घट्ट जुळले आहे गडहिंग्लजमधून कोकणात प्रवेश करताना येथील पर्यटन न्याहाळण्याची संधी पर्यटकांना आहे.

ऐतिहासिक वारसा :
छातिचा कोट करून इतिहासाची साक्ष देणारा आणि शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला सामनागड येथे आहे.

सांस्कृतिक वारसा :
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा केलेले पू . साने गुरूजी मोफत वाचनालय गडहिंग्लजमध्ये आहे.
तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व जेष्ठ साहित्यिक डॉ . राजन गवस यांचे मुळ गाव करंबळी हे आहे.
गडहिंग्लजमधली नाट्यसंस्कृती सर्वदूर पोचली आहे. भडगाव , गडहिंग्लज , करंबळी, कडगाव परिसरात प्रसिद्ध मराठी चित्रपट जोगवा, सत्वपरिक्षा, देवघर यांचे चित्रीकरण  झाले आहे.

सामानगड :
हा किल्ला मुळ ‘ भीमसासगिरी ‘ या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. समुद्रसपाटीपासुन उंची  2972 फूट असून किल्ल्याचे क्षेत्रफळ  12.34 हेक्टर आहे. बाराव्या शतकात राजा भोजने हा किल्ला बांधला गेला तर शिवरायांच्या काळात किल्याची डागडुजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींची या गडावर भेट झाल्याचा इतिहास आहे.

प्रतापराव गुर्जर स्मारक :
नेसरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले होते.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे असे हे स्मारक आहे.

 

 

काळभैरव मंदिर :
प्राचीन कलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहीले जाते डोंगर कपारीत मंदिर असुन शेजारीच शेंद्री चा जलाशय लक्ष वेधून घेतो. दरवर्षी फेब्रुवारीत या देवाची यात्रा भरते.

पेशवेकालीन गणेश मंदिर :
आजरा रोडवरील इंचनाळ येथे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे.

भडगावची गुड्डाईदेवी :
भडगावची ग्रामदेवी श्री गुड्डाईदेवीचे मंदिर उंच टेकडावर आहे.

 

पाहण्यासारखं :

  • किल्ल़े सामानगड
  • सामानगडच्या पायथ्याशी चाळोबा मंदिर
  • नेसरी- कानडेवाडी दरम्यान सरसेनापती प्रतापराव गुर्जरांचे स्मारक
  • माद्याळचे सोमलिंग मंदिर
  • ऐनापुरमधील जैन शिलालेख
  • करंबळीतील नारायणदेव मंदिर
  • शेंद्री , करंबळी , नरेवाडी , वैरागवाडी , तेरणी , येणेचवाडीचे जलाशय

Kille Samangad

किल्ले सामानगड :
किल्ले सामानगड हा शिवकालीन किल्ला आहे. 12 व्या शतकात राजा दुसरा भोज यांनी हा किल्ला बांधला. भोज राजवटीच्या अस्तानंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला. 12.34 हेक्टर क्षेत्रफळातील अंडाकृती आकाराच्या डोंगरावर हा किल्ला आहे. 1667 मध्ये छ. शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर 1676 मध्ये शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली. याठिकाणी सैन्याची रसद, शस्त्रे व दारुगोळा ठेवला जात असे. सर्वांत लहान, परंतु मजबूत किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख होती.
1844 मध्ये करवीर संस्थानचे मंत्री दाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामानगडाच्या गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते. बंडात या गडाचा गडकरी मुंजाजी कदम शहीद झाला. जनरल डिलामोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला व किल्ल्याची नासधूस केली. त्यानंतर सामानगडावरील मामलेदार कचेरी गडहिंग्लज गावी हलविण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांनी या किल्ल्याला भेट देऊन काही काळ वास्तव्य केल्याची नोंद आहे. प्रसंगवशात समर्थांनी शिवरायांच्या समक्ष पाषाण फोडून जिवंत बेडकी काढल्याची घटना याच किल्ल्यातील असल्याचे वर्णन समर्थ चरित्रात आढळते.
कोल्हापूरपासून 80 कि.मी. अंतरावर आग्नेय कोपऱ्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्र सपाटीपासून 2972 फूट उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्यास भक्कम तटबंदी असून टेहळणीसाठी प्रवेश बुरूज, झेंडा बुरूज, वेताळ बुरूज, शेंडा बुरूज असे लहान मोठे दहा बुरूज आहेत.

2006 मध्ये स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने सामानगडाचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळामध्ये समावेश झाला आणि किल्ल्याच्या विकासासाठी एक कोटी 33 लाखांचा निधी मिळाला. त्यातून किल्ल्यावर यात्री निवास, उपहारगृह, विहिरींना संरक्षक कठडे, बगीचा, अंतर्गत रस्ते, डॉरमेटरी, धर्मशाळा, बालोद्यान व सांस्कृतिक सभागृह, इत्यादी कामे झाली. स्व. डॉ. ए. डी. शिंदे यांनी किल्ल्यावरील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला.
दरवर्षी महाशिवरात्रीला गडावरील हनुमान देवाची यात्रा भरते. पंचक्रोशीतील सात पालख्यांची यात्रेत भेट होते. इतिहास संशोधक व अभ्यासकांसह पर्यटक व भाविक गडाला भेट देतात. याशिवाय शाळा-महाविद्यालयांच्या सहली येतात. मात्र, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्धीपासून हा किल्ला अजून दूरच आहे.

ऐतिहासिक महत्त्व :
छ. शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या या किल्ल्यावरील वास्तव्याची इतिहासात नोंद.
संकेश्वरनजीकच्या निडसोशी मठाचे संस्थापक आद्य शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचा जन्म या ठिकाणीच झाल्याची नोंद आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी 21 बाय 14 आकारातील तिरंगा ध्वज या किल्ल्यावरील झेंडा बुरुजावर शासनातर्फे फडकविला जातो. मंत्रालयानंतर इतक्या मोठ्या आकारातील तिरंगा केवळ याच गडावर फडकविला जातो.

काय पहाल..?
रामदासकालीन हनुमान मंदिर, भवानीमाता मंदिर, भुयारी शिवमंदिर, सूर्य मंदिर, चाळोबा मंदिर, भीमशाप्पा मठ, अंधार कोठडी, प्राचीन गुहा, चोरखिंड व सात कमान विहीर, रामखडी (सूर्यास्त दर्शन पॉर्इंट), गायमुख तीर्थ, शाळीग्राम.