About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti,Gadhinglaj

पंचायत समिती, गडहिंग्लज

Senapati Prataprao Gujar Smarak

सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक :
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘कानडेवाडी’ हे गाव मराठी माणसाच्या मनात पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवणारे गाव आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे.  गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले. इतिहासातील एक अत्यंत विषम युध्द या परिसरात घडले. याच बेहलोल खानाला युध्दात हरवल्यानंतर सोडून दिल्याबद्दल छत्रपतींनी सेनापतींना खरमरीत पत्र लिहिले.

‘गनिमास गर्दीस मिळविल्याखेरीज आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’ असे त्या पत्रात लिहिले होते. हे पत्र सरसेनापतींना मिळाले तेव्हा ते सहा स्वारांनिशी टेहळणीवर होते. आपली चूक कळून आल्यानंतर प्रतापराव केवळ सहा सरदारांसह, बहलोलखानाच्या सैन्यावर त्वेषाने चालून गेले. हे लढाई नेसरी-कानडेवाडी गावातील खिंडीत झाली. बेभान होवून सहा स्वारानिशी प्रतापरावांनी खानाच्या हजारोंच्या सैन्यावर चाल केली व हौतात्म्य पत्करले. धन्य ते वीर, धन्य त्यांची ती स्वामीनिष्ठा, असे छत्रपतींच्या शब्दाखातर जीव ओवाळून टाकणारे वीर होते म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. सात ढाली व सात तलवारी यांच्या प्रतिकृती वापरून बांधलेले हे प्रेरणादायी स्मारक आहे.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे.

वेडात मराठी वीर दौडले सात…
आठवा तो इतिहास, जागवा तो पराक्रम, स्वराज्यासाठी वीरांनी केलेल्या अंगावर शहारे आणणारे पराक्रम करून आपणास स्वातंत्र मिळवून दिले. त्यांचा या पराक्रमामुळेच आज आपण गुण्यागोविंदाने जगत आहोत. अशा या विरांना अभिवादन करायला हवेच. तो इतिहास जाग ठेवण्यासाठी अनेक इतिहासप्रेमी पर्यटक अशा स्थळांना भेटी देतात. तो इतिहास जाणून घेतात. कानडेवाडी येथे प्रतापराव गुर्जर यांची स्मारक आहे या स्मारकांला अनेकजण भेट देतात.

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना
लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी लाभार्थीकडे पशुधन उपलब्ध असावे, बायोगॅस बांधकामासाठी घराजवळ मोकळी जागा उपलब्ध असावी.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती लाभार्थीने बायोगॅसचे बांधकाम पंचायत समिती अथवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करताच त्याची पहाणी करुण जसे अनुदान उपलब्ध होईल त्याप्रमाणे अनुदान वाटप केले जाते.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे पशुधनाबाबत ग्रामसेवक यांचा दाखला व रिकाम्या जागेबाबतचा उतारा
या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) बायोगॅस पूर्ण झालेनंतर व शासनाकडून अनुदान प्राप्त होताच लाभार्थीस त्याचे नावे अनुदान आदा केले जाते.
अनुदान वाटपाची पद्धत वरील अनुक्रम नंबर ६ प्रमाणे
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) काही नाही.
१० अन्य फी (असल्यास) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज को-या कागदावर करुन भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. कृषि विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) वरील अनुक्रम नंबर ५ प्रमाणे
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना वरील अनुक्रम नंबर ५ प्रमाणे

बायोगॅस सयंत्र व अनुदान – 

सयंत्रची क्षमता
सर्वसाधारण लाभार्थीसाठी अनुदान रु.
अनुसूचित जाती लाभार्थीसाठी अनुदान
१ घनमिटर
५,५००/-
७,०००/-
२ ते ६ घनमिटर
९,०००/-
११,०००/-
बायोगॅसला शौचालय जोडलेस सर्वसाधारण व अनिसुचीत जातीसाठी रु. १,२००/- अतिरिक्त अनुदान मिळते.

 

विशेष घटक योजना

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणेची योजना (विशेष घटक योजना )

१. लाभार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा. जातीचा दाखला तहसीलदार, प्रातांधिकारी यांच्याकडील असावा .

२. लाभार्थीकडे स्वत:चे नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमिनीचे क्षेत्र ६ हेक्टर पेक्षा कमी असावे.

३. ७/१२ व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.

४. लाभार्थीचे वार्षिक उत्पन ५०,०००/- पेक्षा कमी असले बाबत तहसिलदार यांचा दाखला असणे आवश्यक आहे.

५. यापूर्वी  सादर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६. जे लाभार्थी दारिद्रय रेषे खालील आहेत त्यांना ग्रामसेवक, तलाठी यांच्या सहीचे दाखले चालतात.

अर्ज पंचायत समिती कृषी विभागामार्फत सादर करावा.

अनुदान मर्यादा  – जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेतील त्यांचे साठी रु १,00,000/- व जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार नाहीत त्यांचे साठी रु.  ५०,०००/- कमाल मर्यादा राहील.

योजनेअंतर्गत बाबवर कमाल अनुदान दर्शविणारा तक्ता

अ.नं.
बाब
अनुदान टक्केवारी
कमाल अनुदान मर्यादा
जमीन सुधारणा
१००%
रु. ४०,००० च्या मर्यादेत मृदसंधारण निकषानुसार
निविष्ठा पुरवठा ( खते, बियाणे, औषधे इ.)
१००%
रु. ५,००० च्या मर्यादेत
पिक संरक्षण / सुधारित शेती औजारे
१००%
रु. १०,००० च्या मर्यादेत
बैलजोडी / रेडेजोडी
१००%
रु. ३०,००० च्या मर्यादेत
बैलगाडी
१००%
रु. १५,००० च्या मर्यादेत
जुनी विहीर दुरुस्ती
१००%
रु. ३०,००० च्या मर्यादेत
इनवेल बोअरिंग ( विहीरीत बोअर मारणे )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पाईपलाईन ( ३०० मीटर पर्यंत )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पंपसंच ( डिझेल इंजिन, इले. मोटर )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत
१०
नवीन विहीर खुदाई ( जवाहर योजना निकष )
१००%
रु. १,००,००० च्या मर्यादेत
११
शेततळे ( मृदसंधारण निकष )
१००%
रु. ३५,००० च्या मर्यादेत
१२
परसबाग ( प्रति गुंठा )
१००%
रु. २०० च्या मर्यादेत
१३
तुषारसिंचन / ठिबकसिंचन संच
१००%
रु. २५,००० हेक्टरच्या मर्यादेत
१४
ताडपत्री
१००%
रु. १०,००० प्रति लाभार्थीच्या मर्यादेत

अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

०१ कार्यक्रमाचे / योजनेचे नांव अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )
०२ लाभधारकांसाठी पत्रतेच्या अटी लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे.
०३ लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रमांक २ प्रमाणे
०४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती अर्जासह सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्या नंतर जिल्हा निवड समिती कडून लाभार्थी निवड होते. २ वर्षाच्या कालावधीत रक्कम रु.५०,०००/- पर्यंतच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
०५ पात्रता ठरविण्याचे निकष आणि आवश्यक  कागदपत्रे लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे. मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला सादर करावा.
०६ या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जाते

काय )

लाभार्थी निवड झाल्यानंतर त्याला पुढील प्रमाणे बाब निहाय लाभ दिला जातो. अ-१००% अनुदानाच्या बाबी

१)जलसिंचन – रु.२०,०००/- २) निविष्ठा रु.५,०००/-

३)औजारे व आयुधे रु.१०,०००/-

४) जमीन सुधारणा रु.४०,०००/-  ५) पाईपलाईन – २०,०००/-

६) जुनी विहीर दुरुस्ती रु.३०,०००/- ७) बैलगाडी/बैलजोडा रु.३०,०००/- ८) डीनवल बोअरिंग रु.२०,०००/- ९) परसबाग कार्यक्रम रु.२००/- १०) ताडपत्री रु.१०,०००/-मर्यादेपर्यंत

११) शेततळेरु.३५,०००/-पर्यंत. या प्रमाणे अनुदान देण्यात येते. या व्यतिरिक्त विहीर खुदाई करीता ७०,०००/-ते रु.१ लाखा पर्यंत अनुदान दिले जाते.

०७ अनुदान वाटपाची पद्धत वरील अनुक्रमांक ४,५,व ६ नुसार
०८ अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना पं.स.कार्यालय गडहिंग्लज.
०९ अर्जाबरोबर भरावयाची फी निरंक
१० अन्य फी निरंक
११ अर्जाचा नमुना कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना, यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध .
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,अपत्य दाखला व रहिवाशी दाखला.
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-याचे पदनाम कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापुर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल जिल्हा परिषद स्तरावर निधी उपलब्ध आहे.
१६ लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी सोबत जोडली आहे.
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )
१८ शेरा

कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नांव कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना
लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी 1)      लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी असावा.

2)      अनुदान वजा जाता भरावी लागणारी रक्कम भरणे आवश्यक.

लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती शासनाकडून योजना मंजूर होवून आले नंतर वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे पुर्तता करुन कागदपत्रे सादर करून औजारे किंवा आयुध्ये घेता येते.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे ८ अ चा उतारा, ७/१२ उतारा व ओळखपत्र
या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) सादर कार्यक्रमांतर्गत स्प्रे.पंप, नांगर, भात ऊफळणी पंखे, ताडपत्री, इत्यादी बाबींचा समावेश होतो.
अनुदान वाटपाची पद्धत औजारे किंवा आयुध्ये वाटप करते वेळीच अनुदान वजाजाता लागणारी रक्कम भरणा केली जाते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) अनुदान वजा जाता उर्वरित देय रक्कम
१० अन्य फी (असल्यास) काही नाही
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज को-या कागदावर करुन भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) ८ अ व ७/१२ चा उतारा
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-यांचे पदनाम कृषी विकास अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापुर

१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळी वर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) नाही.
१६ लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )

equipments

कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना
लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी लाभार्थी अल्प भूधारक शेतकरी असावा.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती केंद्रशासन पुरस्कृत योजने अंतर्गत कृषी यांत्रिकी करण्यास अर्थ सहाय्य देण्याच्या योजने अंतर्गत मंजूर असलेल्या पैकी जि बाब घ्यावयाची आहे. त्या बाबीचे कोटेशन सादर करून रोखीने अथवा बँक प्रकरण करून अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेता येतो. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ / मार्केटिंग फेडरेशन या संस्थे कडून करणे आवश्यक आहे.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे

८ अ व ७/१२ चा उतारा

या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) वरील योजने अंतर्गत लाभार्थीस यंत्रीकरण योजने अंतर्गत पॉवर स्ट्रेलर, रोटा व्हेटर, मळणी मशीन, या सारख्या बाबींचा लाभ घेता येतो. त्या बाबत किमतीच्या 25% अथवा मर्यादे पर्यंत लाभ देता येतो.
अनुदान वाटपाची पद्धत अनुदान वजा जाता लागणारी रक्कम भरून बाबींचा लाभ घेता येतो.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम,जिल्हा पातळीवर एवढी रक्कम  उपलब्ध वगैरे ) कृषी विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर स्तरावर.
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )
१८ शेरा ( असल्यास)

तालुका पातळी पिक स्पर्धा

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव तालुका पातळी पिक स्पर्धा
लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी  लाभार्थी शेतकरी असावा.ज्या पिक स्पर्धेत भाग घेणार आहे त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्र आवश्यक. प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क रुपये 20/- कृषी विभागात भरणे.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी     वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती पिकाची कापणी पूर्ण झाल्या नंतर गुणानुक्रमे पहिल्या तीन लाभार्थींना बक्षिस, प्रशस्तीपत्र, व पुढील वर्षी जिल्हा पातळी वर भाग घेण्यास पात्र व क्रमांक ४ साठी फक्त जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे ज्या पिक स्पर्धेत भाग घेणार आहे.त्या पिकाखाली किमान १० आर क्षेत्र असलेचा ७/१२ उतारा
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुक्रमे रुपये २५००/- रुपये १५००/- व रुपये १०००/- एवढ्या रकमेचे बक्षिस व प्रशस्तीपत्र व पुढील तीन वर्षे जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र. क्रमांक चार साठी पुढील तीन वर्षे जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र.
अनुदान वाटपाची पद्धत निकाल जाहीर झालेनंतर व शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नंतर शेतकऱ्यांना चेकने अनुदान देणेत येते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) तालुका पातळीसाठी रुपये २०/- फक्त
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) ७/१२ उतारा
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम,जिल्हा पातळीवर एवढी रक्कम  उपलब्ध वगैरे ) अद्याप प्राप्त नाही.
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास ) १(एक)

 

crops

इंदिरा आवास योजना ( नवीन घरकुल )

पंचायत समिती गडहिंग्लज येथील संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव इंदिरा आवास योजना ( नवीन घरकुल )
लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी 1.      दारिद्र रेषेच्या सर्व्हेक्षणात नोंद असणे आवश्यक.

2.      घर बांधणेस स्वत:ची जागा,पडसर, जिर्णघर असणे आवश्यक

3.      यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

4.      ग्रामसभेच्या ठरावाने कमी गुणाकाने प्राधान्य क्रमयादीतून निवड होणे आवश्यक

लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी     वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती संबंधित ग्रामपंचायती मार्फत घरकुल बांधणेसाठी प्रस्ताव सादर झालेनंतर त्याची छाननी करून प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविला जातो व तिकडून मंजुरी प्राप्त झालेवर लाभ दिला जातो.

 

पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे संबंधित ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव व अनुक्रम नंबर दोन मध्ये नमूद केलेल्या बाबींची प्रमाणपत्र
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) लाभार्थीस शासनामार्फत रक्कम रुपये ९५०००/- इतके अनुदान दिले जाते त्यामध्ये लाभार्थीने स्वत:चा हिस्सा म्हणून रक्कम रुपये ५००० /-

 

अनुदान वाटपाची पद्धत प्रस्तावास मंजुरी मिळालेनंतर जस जसे काम पूर्ण होईल त्या प्रमाणे ग्रामपंचायती मार्फत अनुदान आदा केले जाते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? गटविकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे काही नाही.
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) अनुक्रम नंबर दोन मध्ये नमूद केले प्रमाणे सर्व दाखल्याच्या प्रती
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना काही नाही.
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान गटविकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) शासनाकडून प्राप्त अनुदान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत वितरीत केले जाते.
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी लाभार्थी याद्या ग्रा.प. निहाय गांव पातळीवर व पं.स.कार्यालयात ठेवणेत आलेल्या आहेत.
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास ) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत ठरविले जाते ते उद्दिष्ठ आहे.
१८ शेरा ( असल्यास)

home1

राजीव गांधी ग्रामिण योजना क्रं. २

पंचायत समिती गडहिंग्लज येथील संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राजीव गांधी ग्रामिण योजना क्रं. २
लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी 1.      घर बांधणेस स्वत:ची ७०० चौ.फु. जागा . असणे आवश्यक. २. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ग्राम सभेचा ठराव ३ तहसिल दार यांचा ९६०००/- चे आतील उत्पन्नाचा दाखला ४ रहिवासी दाखला ५ शासकिय कर्ज बोजा नसलेचा दाखला ६. लाभार्थीची रक्कम रु. १००००/- राष्ट्रीय कृत बैंकेतील गुंतवणुक
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती संबंधीत ग्रामपंचायती मार्फत घरकुल बांधणेसाठीचे प्रस्ताव सादर झालेनंतर त्याची छाननी करून बैंकेची पात्र अपात्र शिफारसी सह प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे कडे पाठविला जातो व तिकडून मंजुरी प्राप्त झालेवर लाभ दिला जातो.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे संबंधीत ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव व अनुक्रम नंबर दोन मध्ये नमूद केलेल्या बाबींची प्रमाणपत्रे
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) लाभार्थीस शासनामार्फत रक्कम रुपये ९००००/- इतके अनुदान दिले जाते त्यामध्ये लाभार्थीने स्वत:चा हिस्सा म्हणून रक्कम रुपये १००००/-
अनुदान वाटपाची पद्धत बँकेमार्फत कर्ज वाटप
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? गट विकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) काही नाही.
१० अन्य फी (असल्यास) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहीजे, हे ही स्पष्ट करावे. नमुना फॉर्म पं.स. स्तरावर उपलब्ध आहे.
१२ सोबत जोडावयाची परीशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले / दस्तऐवज ) अनुक्रम नंबर दोन मध्ये नमुद केले प्रमाणे सर्व दाखल्याच्या प्रति
१३ त्या परीशिष्टांच्या काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना काही नाही.
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम गट विकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) वर्षातील होणाऱ्या व्याजाची रक्कम शासना कडून प्राप्त अनुदान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत वितरीत केले जाते
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी लाभर्थी याद्या ग्रां.प. निहाय गांव पातळीवर व पं.स. कार्यालयात ठेवणेत आलेल्या आहेत.
१७ उद्दीष्ट ( ठरविले असल्यास ) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत ठरविले जाते ते उद्दीष्ठ २७४ घरकुले बांधणेच उद्दीष्ठ आहे.

राजर्षी शाहू घरकुल योजना

पंचायत समिती गडहिंग्लज जि.. येथील समाज कल्याण विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पध्दत

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राजर्षी शाहू घरकुल योजना २०% जि प राखीव निधी योजना.

 

लाभधारकांसाठी पात्रतेच्या अटी 1)      ग्रा.पं चा ग्राम सभेचा ठराव २) जातीचा दाखला ३) रक्कम रु. ५००००/- आतील उत्पन्नाचा दाखला ४) स्वताच्या नावावरील मोकळ्या जागेचे घरठाण पत्रक ५) रहिवाशी दाखला
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रमांक दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती लाभार्थीचा अर्ज ग्रामसेवक, जिल्हा परीषद सदस्य, विस्तार अधिकारी पंचायत व गट विकास अधिकारी यांचे कडे पंजुरीसाठी सादर केला जातो.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन मध्ये नमुद केलेल्या अटीची पुर्ततेनुसार.
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) लाभार्थीस जिल्हा परीषदे कडील २०% राखीव निधी मधून रक्कम रुपये ४००००/- अनुदान दिले जाते.
अनुदान वाटपाची पद्धत लाभार्थीची निवड झालेनंतर घराचे काम सुरु करणेसाठी ग्रामपंचायत यांचेकडे रक्कम आदा केले जाते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? वरील अनुक्रम नंबर ४ मध्ये नमुद केलेल्या मार्गाने.
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. पंचायत समिती गडहिंग्लज येथील समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे.
१२ सोबत जोडावयाची परीशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले / दस्तऐवज ) जिल्हा परीषद सदस्यांची शिफारस.
१३ त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना काही नाही.
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती  कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम गट विकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी यादी समाज कल्याण विभाग पं.स. येथे उपलब्ध आहे.
१७ उद्दीष्ट ( ठरविले असल्यास ) जिल्हास्तरावर निश्चीत केले जाते.
१८ शेरा ( असल्यास )

home