- १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय करणे या योजनेंतर्गत एका युनिटव्दारे १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करावयाचे असून पक्षीगृह बांधकामाचा व इतर साहित्यांचा अपेक्षित खर्च रु. २,२५,०००/- गृहीत धरण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के , अनुदान म्हणजेच रु. १,१२,५००/- तर अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी ७५ टक्के अनुदान म्हणजेच रु. १,६८,७५०/- या प्रमाणात अनुदान अनुज्ञेत आहे.
- अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
१) अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत/तहसिलदार
२) ७/१२ उतारा,८ अ घरठाण उतारा ( असेसमेंट )
३) दारिद्र्य रेषेखालील दाखला.
४) सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)
५) महिला बचत गट.
६) रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)
७) अपत्य दाखला.
८) रहिवाशी व शौचालय असलेचा दाखला
९) बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र
- लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.
१) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक लाभार्थी
३) अल्प भूधारक लाभार्थी
४) सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी
५) महिला बचत गटातील लाभार्थी
- विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम ( वैरण विकास कार्यक्रम ) – वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उत्साहित करणे. स्वत:ची तीन ते चार जनावरे असतील अशा सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये यशवंत व जयवंत सुधारीत बहुवर्षीय ठोंबे वाटप १०० टक्के अनुदानावर करण्यात येतात.
Post Views: 201