- अनुदान व आर्थिक निकष :- शेळी गट ( १० + १ ) योजना अंदाजीत किंमत ( विम्यासह ) रु. ७१२७९/- आहे. ७५% शासकिय अनुदान रु. ५३४२९/- व २५% लाभार्थी स्वहिस्सा रु. १७८१/-
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
- अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत/तहसिलदार
- ७/१२ उतारा,८ अ घरठाण उतारा ( असेसमेंट )
- दारिद्र्य रेषेखालील दाखला.
- सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)
- महिला बचत गट.
- रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)
- अपत्य दाखला.
- रहिवाशी व शौचालय असलेचा दाखला
- बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र
लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भूधारक लाभार्थी
- अल्प भूधारक लाभार्थी
- सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी
- महिला बचत गटातील लाभार्थी
- एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम – जिल्ह्यातील सधन कुक्कुट विकास प्रकल्पात अपारंपरिक पशुपक्षी पालन करणे व स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना देणे तसेच अंडी व मांस उत्पादनात लक्षणीय वाढ करणे. स्वयंरोजगार निर्मिती करणे.
- कामधेनु दत्तक ग्राम योजना – जनावरांचे आरोग्य संवर्धन व दुध वाढविण्यासाठीची योजना. दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील १ गांव निवडून १२ टप्यात वर्षभर दुधउत्पादन व वैरण उत्पादन इत्यादीसाठी योजना राबविणे.
- नाविन्यपूर्ण योजना ( शेळी (१०+१) / कुक्कुट पक्षीगृह बांधकाम योजना ) –
- ठाणबंध शेळी पालन योजने अंतर्गत ( १० + १ ) शेळी गट पुरविणेत येतो व स्वंयरोजगार निर्मिती करणे ५० टक्के अनुदानावर सदर योजना राबविली जाते. सदर योजना सर्वसाधारण ५० टक्के व अनुसूचित जाती ७५ टक्के आहे. प्रकल्प किंमत रु ८७,५००/- अशी असून सर्वसाधारण लाभार्थी हिस्सा ४३,४२९ /- अनुसूचित जाती लाभार्थी हिस्सा २१,९६४/- आहे. स्वहिस्सा लाभार्थीने स्वत: करायचा आहे अथवा बँकेद्वारे उभा करावयाचा आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
१) अनुसूचित जाती/जमाती लाभार्थी जातीचा दाखला प्रांत / तहसिलदार
२) ७/१२ उतारा,८ अ घरठाण उतारा ( असेसमेंट )
३) दारिद्र्य रेषेखालील दाखला.
४) सुशिक्षित बेरोजगार(एमप्लायमेंट दाखला)
५) महिला बचत गट.
६) रेशनकार्ड व ओळखपात्र मतदान/आधारकार्ड सत्यप्रत)
७) अपत्य दाखला.
८) रहिवाशी व शौचालय असलेचा दाखला
९) बँक / पतसंस्था / स्वगुंतवणूक हमीपत्र
लाभार्थी निवड खालील निकषानुसार केली जाते.
१) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक लाभार्थी
३) अल्प भूधारक लाभार्थी
४) सुशिक्षित बेरोजगार लाभार्थी
५) महिला बचत गटातील लाभार्थी
Post Views: 1,428