- हस्तचलित कडबाकुट्टीयंत्राच्या वापरांसाठी प्रोत्साहन – उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर करणेतसेच वाया जाणाऱ्या वैरणीचे प्रमाण कमी करणे. केंद्र हिस्सा ७५ टक्के व लाभार्थी हिस्सा २५ टक्के रु. ३,७५०/- इतके अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
- अझोला लागवड व उत्पादन केंद्राचे प्रात्यक्षिक – हिरव्या वैरणीकरीता पर्यायी म्हणून अझोला लागवडीसाठी शेतकऱ्यांना अत्यावश्यक साधनसामुग्रीसह प्रशिक्षण देणे.
- गवती कुरणांचा विकास – हलक्या / पडीक जमिनी विकसीत करून, कृषी हवामान प्रभागानुसार योग्य एकदल / व्दिदल प्रजातीची लागवड करणे. जमिनीची धुप थांबवणे व वैरणीचे उत्पादन करणे उत्पादित वैरण पशुधन, पोषणांसाठी वापरून पशुधनाच्या आहारातील वैरणीची तुट कमी करणे.
- वैरणीच्या विटा तयार करणाऱ्या केंद्राकरिता अर्थसहाय्य.
- क्षेत्रनिहाय क्षारमिश्रण व पशुखाद्यनिर्मिती केंद्राची स्थापना.
- मूरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य – अतिरिक्त हिरव्या चाऱ्याची आधुनिक पद्धतीने साठवण करून टंचाई काळात पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याची गरज भागविणे. १०० टक्के केंद्र हिस्सा मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्याकरिता रु. १.०५ लक्षाचे अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. यामध्ये रु. ७५,०००/- मुरघास खड्याचे बांधकाम करण्यासाठी व रु. ३०,०००/- विजेवर चालणाऱ्या कडबाकुट्टी यंत्र खरेदीकरीता अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.
Post Views: 266